… यामुळे होते विद्यार्थ्यांचे खच्चीकरण, देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यात एमपीएससी (MPSC) ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याबद्दल परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या संताप निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका करताना म्हटले आहे की, यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. १४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा आज सकाळी अचाकन आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले. या परीक्षा पुढे कधी घेतल्या जातील, याविषयी देखील काहीही स्पष्ट न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणालेत, राजकीय पक्षांच्या सभा सुरू आहेत. आंदोलन चालू आहेत. सगळेच पक्ष आपापले कार्यक्रम करत आहोत. सत्तापक्षाच्या ‘ट्रॅक्टर रॅली’ होत असतात. परीक्षेमध्ये तर सोशल डिस्टन्सिंग पाळले जात असते. सरकारने दिलेले करोनाचं कारण अतिशय तकलादू आहे. या कारणामुळे परीक्षा रद्द करणे अतिशय चुकीचे होईल. मराठा विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल. पण आज या परीक्षा तात्काळ घ्यायला हव्यात.

फडणवीस यांनी ट्विट केले – “MPSC च्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलल्यामुळे वर्षानुवर्ष त्यासाठी तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER