हा कोल्हापुरी पॅटर्न मुख्यमंत्री राबवणार राज्यभर

CM Uddhav Thackeray

कोल्हापूर : माझे कुटुंब माझी जबाबदारी (My family my responsibility) या मोहिमेंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकार्यांनी ‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही, मास्क नाही सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा गौरव केला.

पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यामंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यतमंत्री सतेज पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे पालकसचिव सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत जनतेचा सहभाग वाढवावा. ही मोहीम लोकचळवळ व्हावी. यातून महाराष्ट्र आरोग्य संपन्न व्हावा यासाठी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे यासाठी नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती होणे गरजचे आहे. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही असा अभिनव उपक्रम कोल्हापूरने सुरु केला आहे. हा उपक्रम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल त्यामुळे हा उपक्रम राज्यभर न्ह्यायला हवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER