पुणे पदवीधरसाठी सतेज पाटील यांनी केला हा पण

Satej Patil

कोल्हापूर : पुणे पदवीधर तसेच शिक्षक विधानपरिषद मतदार संघात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्या जोरदार लढत होणार आहे. मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादीसह (NCP) काँग्रेसचे प्राबल्य आहे. महाविकास आघाडीतर्फे राज्यात ही निवडणूक लढविली जाणार आहे. पुणे पदवीधर किंवा शिक्षक मतदार संघातील एक जागा काँग्रेसला द्या, ती निवडून आणू हा आपला शब्द आहे आणि तो मी खरा करीनच असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी गुरूवारी कोल्हापुरातील (Kolhapur) काँग्रेसच्या (Congress) शेतकरी मेळाव्यात स्पष्ट केले.

पुणे (Pune) विभागातील निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठतेची आहे. यानिमित्ताने काँग्रेसला जागा मिळाल्यास सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात अप्रत्यक्ष लढा होणार आहे. शिक्षक किंवा पदवीधर विधानपरिषद मतदार संघातील कोणतीही एक उमेदवारी काँग्रेस द्या, अशी मागणी काँग्रेसचे राज्याचे एच.के. पाटील यांच्याकडे ना. सतेज पाटील यांनी केली. कोल्हपूरसह चार जिल्ह्यात काँग्रेसतर्फे दोन्ही मतदार संघात चांगली बांधणी केली आहे. एकजुटीने यातील जी जागा द्याल, ती निवडणून आणण्याची हमी त्यांनी यावेळी दिली. सांगली, सातारा, पुणे, सोलापुरातील काँग्रेसच्या नेत्यांनी यानिवडणुकीची मोठी तयारी केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आदींच्या साथीने उमेदवार सहज निवडणूक आणू असे ना. पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER