मॉडेलिंगच्या दिवसात अशी दिसत होती दीपिका पादुकोण, पाहा ट्रांसफॉर्मेशन फोटोज

Deepika Padukone

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) इंडस्ट्रीत खूप मोठा पल्ला गाठला आहे. इंडस्ट्रीमध्ये दीपिकाने आपल्यासाठी एक खास जागा बनवली आहे. या अभिनेत्रीने शाहरुख खानसमवेत (Shahrukh Khan) ‘ओम शांती ओम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट वर्ष २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर दीपिकाने ‘लव आज कल’, ‘कॉकटेल’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘पीकू’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यासह अनेक चित्रपट केले. दीपिका पादुकोण आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

या निमित्ताने आज आपण दीपिकाच्या मॉडेलिंगच्या दिवसातील काही फोटो बघूया, ज्यात आपण दीपिकाला ओळखु शकणार नाही. यासह, आपण दीपिकाच्या जीवनाशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये जाणून घेऊ …

डेन्मार्क मध्ये जन्म झाला…
दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन शहरात झाला होता. दीपिका आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे. दीपिकाची आई उजाला ट्रॅव्हल एजंट आणि लहान बहीण अनिशा गोल्फ प्लेयर आहे. दीपिका फक्त एक वर्षाची असतानाच तिचे आई-वडील बंगळुरूला स्थायिक झाले.

शिक्षण सोडून मॉडेलिंग मध्ये आली
बंगळूरमधील सोफिया हायस्कूल व माउंट कार्मेल कॉलेजमधून पूर्व-विद्यापीठ शिक्षण (Pre-University Education) पूर्ण केले. यानंतर दीपिकाने बीए (समाजशास्त्रात) करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (IGNOU) प्रवेश घेतला, परंतु शिक्षण मधातच सोडले आणि मॉडेलिंगकडे गेले.

वयाच्या ८ व्या वर्षापासून केले अभिनय …
दीपिका पादुकोणने आपल्या करिअरची सुरुवात लहान वयातच केली होती. वयाच्या ८ व्या वर्षी दीपिका अनेक एड्समध्ये दिसली. यानंतर, टीन-एजमध्ये दीपिकाने लिरिल आणि क्लोज-अप सारख्या ब्रँडच्या एड्स केल्या. हिमेश रेशमियाच्या लोकप्रिय अल्बम नाम है तेरामध्येही ती दिसली आहे.

दक्षिण चित्रपटांसह केले कारकिर्दीची सुरूवात …
२००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’ तून पडद्यावर एन्ट्री घेतली होती. चित्रपट यशस्वी झाला. एका वर्षानंतर दीपिकाला शाहरुख खान सोबत असलेल्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटापासून मोठा ब्रेक मिळाला. बर्‍याच चित्रपटांत उत्कृष्ट अभिनय करून ती प्रेक्षकांची आवडती ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER