हा सर्व पक्षांच्या एकजुटीचा विजय : अजित पवार

Mahavikas Aghadi - Ajit Pawar

मुंबई :- विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला (BJP) मोठा पराभव स्वीकारावा लागला. नागपूर (Nagpur), पुणे (Pune), औरंगाबाद (Aurangabad) या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भावना व्यक्त केल्या.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजुटीचा विजय आहे. राज्यातील जनतेचा सरकारवरील विश्वास असल्याचे हे प्रतीक आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार! महाविकास आघाडीचे अन्य उमेदवारही आघाडीवर असून त्यांचा विजय लवकरच जाहीर होईल, असे अजित पवार म्हणाले .

पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाच्या पदरी निराशा पडली. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्याने विजयी झाले. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण (Satish Chavan) ५८ हजार मताधिक्याने विजयी झाले. अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

ही बातमी पण वाचा : … ते मुख्यमंत्र्यांचे  कौतुक की अब्रु काढणं हे अजित पवारच सांगू शकतात ; भाजपा नेत्याचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER