‘भाजपविरोधात उभं राहण्याची हीच ती वेळ’, ममतादीदींचे पवार, ठाकरेंना पत्र

Mamata Banerjee - Sharad Pawar - Uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई :- विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला असल्यानं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासमोर भारतीय जनता पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे भाजपची विजयी घोडदौड रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाही समावेश आहे.

ममता बॅनर्जी यांनी पत्रातून विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी सुचवलं आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रात सात मुद्द्यांचा उल्लेख केला असून भाजप सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरोधात एकजुटीनं उभं राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्याला सोबत येऊन भाजपचा मुकाबला करायला हवा, असं आवाहन केलं आहे. तसंच देशातील जनतेसमोर आपण नवा पर्याय ठेवला पाहिजे असंही मत व्यक्त केलं आहे.

ही बातमी पण वाचा : ममता बॅनर्जींचे गौत्र ‘शांडिल्य’; असदुद्दीन ओवैसी भडकले!

नुकताच दिल्लीत नवीन कायदा मंजूर करण्यात आला असून यामध्ये केंद्राचे प्रतिनिधी असणाऱ्या नायब राज्यपालांना लोकनियुक्त सरकारच्या तुलनेत जास्त अधिकार देण्यात आले आहेत. ममता बॅनर्जी यांनी पत्रामध्ये याचा उल्लेख करत देशातील अशा सात घटनांचा उल्लेख केला आहे ज्याला त्यांनी भाजपाने लोकशाही आणि सहकारी संघराज्यावर केलेला हल्ला, असं म्हटलं आहे.

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून लोकनियुक्त सरकारच्या कारभारात अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला वाटतं ती वेळ आली आहे, जेव्हा भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. टीएमसीची प्रमुख म्हणून मी मनापासून तुमच्यासोबत आणि समविचारी इतर पक्षांसोबत या लढ्यात आहे, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जींनी हे पत्र सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच डीएमकेचे स्टॅलिन, वायएसआर काँग्रेस प्रमुख जगन मोहन रेड्डी, बीजेडी प्रमुख नवीन पटनाईक, तेलंगण राष्ट्र समिती प्रमुख चंद्रशेखर राव, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पाठवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button