ही सरकारांनी जागे होण्याची आणि कर्तव्यपालन करण्याची वेळ; सोनिया गांधींचे आवाहन

Sonia Gandhi

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचं प्रचंड संकट निर्माण झाल्यानं काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत केंद्र सरकारला कोरोनाचा सामना करण्यासाठी काही सल्ले दिले आहेत. कोरोना महामारीच्या संकटात तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. तसेच, सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने रणनीती तयार करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, की सर्व राजकीय पक्षांच्या सल्ल्याने कोरोनाचा सामना करण्यासंदर्भात रणनीती तयार करायला हवी. काँग्रेस पक्ष देशाला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या सर्व निर्णयांत साथ देईल.

सद्य:स्थिती मानवतेसाठी धक्कादायक आहे. काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे. तर काही ठिकाणी आयसीयू बेड्सची टंचाई आहे. ही परीक्षेची वेळ आहे. एकमेकांना मदत करा. आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा. घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे, असं सांगतानाच कमी वेळात सर्वांना व्हॅक्सिन मिळावी म्हणून सर्व राज्यांमध्ये व्हॅक्सिनशी संबंधित लायसन्स द्यायला हवेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना जागे होण्याचं आवाहनही केलं. केंद्र आणि राज्य सरकारांनी आता जागे व्हावे.

आपलं कर्तव्य पार पाडावे, असं आवाहन करतानाच केंद्र सरकारने गरिबांच्या बाबतीत विचार करावा आणि पलायन रोखण्यासाठी हे संकट संपेपर्यंत त्यांच्या खात्यात सहा  हजार रुपये टाकावेत, कोरोना चाचण्या वाढवा, ऑक्सिजन, औषधांचा साठा युद्धपातळीवर पुरवा, मोफत लसीकरणाची व्यवस्था करा, कोरोना लसीच्या किमतींमधील तफावत दूर करा, जीवनावश्यक औषधांचा काळाबाजार बंद व्हायला हवा, मेडिकल ऑक्सिजन रुग्णालयांना देण्याची तत्काळ व्यवस्था करण्यात यावी, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button