वाराला प्रतिवार, ही तर शिवाजी महाराजांची शिकवण; अजित पवारांना चंद्रकांत पाटलांनी धुनकले

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी माझी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची यादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून चोरून राज्यपालांना सादर केल्याचा मुद्दा उपस्थित केला. वाराला प्रतिवार करणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, असा टोमणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मारला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर करण्याचा विषय चौदा महिने जुना आहे, आता का काढता, असा सवाल अजित पवार यांनी केला. त्यावर पाटील म्हणाले की, महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे मी म्हटल्यावर अजित पवार यांनी काही बोलण्याची गरज नव्हती. मी त्यांना काही म्हणालो नव्हतो, परंतु त्यांनी त्यावर माझी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. चौदा महिने झाले, तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. पवारांची कृती कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button