हे शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या प्रयोगाचे यश – अजित पवार

Sharad Pawar - Sonia Gandhi - Uddhav Thackeray - Ajit Pawar

पुणे :- एक वेगळा प्रयोग शरद पवार (Sharad Pawar), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला त्याचे हे यश आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली.

अमरावती येथे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या  (शिवसेना)  उमेदवाराचा पराभव झाला. याबद्दल पवार म्हणालेत, अमरावतीची जागा आली असती तर आणखी आनंद झाला असता. तिथे जे घडले त्याचे दुःख आहे.

वाचाळ बडबड करणाऱ्यांना ही जबरदस्त चपराक आहे. लोकांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पाठिंबा दिला आहे, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. सुशिक्षित तसेच शिक्षक मतदारांनी आम्हाला निवडून दिले. तीन पक्ष एकत्र येण्याचा फायदा होतो हे सिद्ध झाले. आम्ही एकटे लढायचे की आघाडी करून हे आमचे वरिष्ठ ठरवतील, आम्हाला कोणी सल्ला द्यायचे कारण नाही, असे ते म्हणालेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण तर पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. नागपूर पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी विजयी झाले आहेत. पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बादफेरीपर्यंत पोहचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर आहेत.

ही बातमी पण वाचा : माह्यासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर… गावरान शैलीत अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER