ही आहे ‘ऑडी’ नावामागची गोष्ट

This is the story behind the name 'Audi'

जर्मनीतल्या तीन कंपन्यांचं जगभरातल्या कार इंडस्ट्रीवर राज्य आहे. पहिली मर्सेडीझ (Mercedes), दुसरी बीएमडब्ल्यू (BMW)आणि तिसरी ऑडी (Audi). कार उत्पादनाच्या दुनियेत ऑडीनं स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या या कंपनीच नाव ऑडी कसं पडलं याच उत्तर तुम्हाला माहितीये का?

एका कोर्ट केसमुळं पडलं ऑडी हे नाव

ज्यावेळी मर्सेडीझ कंपनीने जर्मनीत पाय पसरायला सुरुवात केली त्याचवेळी ऑडीच्या कहाणीला सुरुवात झाली होती. १८९९ला जर्मनीचे प्रतिभावान इंजिनिअर ऑगस्ट होर्च यांनी होर्च अँड सी कंपनीची स्थापना केली. फक्त १५ कामगारांच्या साथीनं. याच कामगारांनी पहिली ऑडी कार बनवली होती.

१९०४मध्ये मोटोवेगनवर्क एजी या कंपनीसोबत मिळून होर्च यांनी कार बनवायला सुरुवात केली. पण यांच आपसात जास्त काळ पटलं नाही. १९०९ला होर्च यांनी मोटोवेगन वर्कला नारळ दिला. आणि जीएमबीएच नावाची नवी कंपनी उभारली. त्यांच्या या नावावर मोटोवेगनवर्क यांनी आपत्ती दर्शवली होर्च यांना कंपनीचं नाव बदलायची नोटीस मिळाली. कंपनीच नाव होर्च यांना बदलावच लागणार होतं. यावर व्यापारी मित्रांसोबत होर्च चर्चा करत असताना त्यांच्या एका मित्रानं नाव सुचवलं. ‘ऑडी’ हा एक लॅटीन शब्द होता ज्याचा अर्थ ऐकणे असा होतो.

मजेशीर गोष्ट ही होती की ऑडीचे संस्थापक होर्च यांच्या नावाचा अर्थही ऐकणे असा होतो. त्यामुळं दोन्ही नावातली समानता लक्षात घेवून ऑगस्ट होर्च यांनी जीएमबीएच कंपनीच नाव बदलून ऑडी ठेवलं.

पहिल्या महायुद्धावेळी झालं होतं प्रचंड नुकसान

पहिल्या महायुद्धा आधी अनेक महान गाड्या या कंपनीने बनवल्या. व्यवसायात जम बसायला सुरुवात झाली होती. १९१०ला ऑडीनं टाइप ए या कारला मार्केटमध्ये आणलं. ग्राहकांनी या कारला चांगलीच पसंदी दर्शवली. यानंतर लगेच ऑडीनं रेसिंग कार्सच निर्माण  करायला सुरुवात केली. अनेक रेसिंगच्या स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. इंटरनॅशनल ऑस्ट्रेलियन अल्पाइनच्या रेसचा किताब ऑडीन सलग तीन वर्ष जिंकला. एकूण काय तर ऑडीचे दिवस चांगले चाललेच होते इतक्यात पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. कंपनीला मजबूरीनं युद्ध वाहनं बनवावी लागली. जर्मन सैन्यासाठी कार्स आणि मोठी वाहनं ऑडी बनवू लागली.

पुढं १९२०ला कंपनीचे संस्थापक ऑगस्ट हॉर्च यांनी कंपनीला रामराम ठोकला. पण मॅनेजमेंटनं ही कंपनी जिवंत ठेवली. जागतिक पटलावर कार उत्पादनाच्या दुनियेत एक ब्रँड म्हणून ऑडी समोर आली होती.

चार कंपन्या एकत्र येवून बनाला नवा लोगो

१९२७ ते १९३० ऑडीसाठी संघर्षाचा काळ होता. कंपनी डबघाईला निघायच्या बेतात होती. तेव्हा आणखी तीन कंपन्यांना याच नावाखाली एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९३२ला ऑडीनं हॉर्च, डीकेडब्ल्यू, आणि वंडरर सोत मिळून कार बनवण्याचा निर्णय़ घेतला. या पद्धतीनं एकूण चार कंपन्या एकत्र येवून कार बनवू लागल्या. या चारही कंपन्यांच्या प्रातिनिधीक स्वरुपात चार रिंग बनवण्यात ऑडीच्या नव्या लोगोच्या स्वरुपात. जो आजही जसाच्या तसा आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या आधी ऑडीने अनेक श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या कार्सचं निर्माण केलं. जगभरात ऑडीची हवा होती. परत दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि जर्मन सैन्यासाठी युद्धवाहन बनवण्याची ऑडीवर वेळ आली.

व्होक्स वॅगन समुहाचा बनलीये हिस्सा

दुसऱ्या महायुद्धात जर्मनी देशातील प्रमुख उद्योगांची सोव्हियत रशियान प्रचंड नुकसान केलं. इतक्या मोठ्या नुकसानानंतरही कंपनीनं हार मानली नाही.

पुढं १९६४ला वॉक्सवॅगननं ऑडी खरेदी केली. यानंतर ऑडीनं कधीच मागं वळून पाहिलं नाही. संपूर्ण जगासाठी ऑडी श्रीमंतीच प्रतिक बनलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER