राज ठाकरेंना कार्यकर्ते हेच कवच, मनसे नेत्या रुपाली पाटील ठाकरे सरकारवर भडकल्या

Rupali Patil - Raj Thackeray - Uddhav Thackeray

पुणे : राज्य सरकारने राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे नेत्या रुपाली ठोंबरे पाटील चांगल्याच भडकल्या आहेत. आघाडी सरकारने राज ठाकरेंची (Raj Thackeray) सुरक्षाव्यवस्था आणखी वाढवण्याऐवजी कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मनसेचे (MNS) कार्यकर्ते हेच राज ठाकरेंचे कवच असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

राज ठाकरेंची झेड सुरक्षा कमी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. सरकारला सत्तेत आल्यापासून याच खेळी खेळायला का आवडतात? राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते आहेत. शरद पवार, राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांची सुरक्षा कमी करुन त्यांचं महत्त्व कमी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत असाल, तर मोठी चूक करत आहात, असं रुपाली पाटील म्हणाल्या.

राज ठाकरे यांचे लाखो, असंख्य चाहते हेच त्यांचं कवच आहे. भाजप सरकारनेही हेच केलं होतं. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीच फरक दिसत नाही. तीच राजकीय गणितं घाणेरड्या पद्धतीने रंगवणं निषेधार्ह आहे. राज ठाकरे हे अतिमहत्त्वाचे नेते आहेत. मागच्या सरकारमधील मंत्र्यांची सुरक्षा कमी करणं समजू शकतो, पण सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावं. नाहीतर त्यांची अवस्था भाजपसारखी होईल. कारण सत्तेचा गैरवापर आणि चुकीचे निर्णय हे जनता पाहत असते. त्याचा परिणाम सरकारवर होत असतो, असंही रुपाली पाटील म्हणाल्या.

सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावं. भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) काहीही फरक नाही, राज ठाकरेंना कार्यकर्ते हेच कवच, राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकारने निर्णय घ्यावा, अश्या शब्दात रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी सरकारला खडसावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER