सत्तांतरासाठी हीच योग्य वेळ : सोनिया गांधी

Sonia Gandhi

दिल्ली :- बिहारमधील नितीश कुमार यांचे सरकार अहंकारात बुडालेले आहे. या अहंकारी सरकारला बदलण्याची वेळ आली आहे, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बिहारच्या मतदारांना केले. बिहारमध्ये बुधवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

त्या म्हणाल्या – बिहारच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीला मी नमन करते. आज बिहारमधील सत्ता आणि अहंकारात बुडालेले सरकार आपल्या मार्गावरुन भरकटले आहे. कामगार असहाय्य झाले आहेत. शेतकरीही चिंतेत आहेत. तरूणही निराश आहेत.

अर्थव्यवस्थेच्या वाईट परिस्थितीचा आज लोकांना त्रास होतो आहे. बिहारची जनता काँग्रेस महाआघाडीसोबत उभी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिल्ली आणि बिहारमधील सरकार बंदी घालणारी आहेत. नोटबंदी, व्यापार बंदी, आर्थिक बंदी, शेती बंदी आणि रोजगार बंदी केली जात आहे. याविरोधात बिहारमधील जनता एकजूट झाली आहे. आता बदल करण्याची वेळ आहे. नवे विचार आणि नवी शक्ती निर्माण झाली असून नव्या भारताचा अध्याय लिहिण्याची हीच वेळ आहे, असे सोनिया म्हणाल्यात.

बिहारच्या नागरिकांमध्ये गुण, कौशल्य, सामर्थ्य, शक्ती आहे. परंतु बेरोजगारी, स्थलांतर, महागाई आणि उपासमारीमुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. जे आपल्याला बोलता येत नाही त्यांना अश्रूंद्वारे वाट करून दिली जात आहे. गुन्ह्यांच्या जोरावर धोरण आणि सरकार उभे करता येत नाही. बिहार भारताचा आरसा आहे आणि एक आशा आहे. भारताचा विश्वास आहे. बिहार हा भारताची शान आणि अभिमान आहे, असे त्या म्हणाल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER