कोल्हापुरतील देवाला सोडलेला पालवा याकारणाने चर्चेत

Kolhapur

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील नौकूड येथे देवाला सोडलेला पालवा सध्या फारच चर्चेत आला आहे. अंगापिंडान धष्टपुष्ट झालेला हा पलवा दुचाकीस्वार दिसला रे दिसला की धावत येतो आणि एक जोराची धडक देतो. मग काय पलव्याच्या एका धडकेत जाग्यावर गाडी पलटी आणि चालक उलटी झाल्याशिवाय राहत नाहीत. अशा या पालव्याच्या प्रतापामुळे गावात एक प्रकारची दहशतव निर्माण झाली आहे. तर अनेकांच्या उरात धडकी भरली आहे. या पालव्याने अनेकांना उलथेपालथे केले असून, ग्रामपंचायतीने तर पालव्यापासून सावधान.. असे फलकच प्रसिध्द केला आहे.

त्याच झालय असं की, गडहिंग्लज तालुक्याच्या नौकुड गावात लक्ष्मी देवाला हा काळाभोर रंगाचा अंगापिंडान धष्टपुष्ट पालवा सोडला आहे. उंचापुरा आणि ताकदवान पालव्याने मात्र गेल्या काही दिवसांपासून दुचाकीस्वार दिसला रे दिसला की धावत येऊन धडक द्यायला सुरूवात केली आहे. या पालव्याच्या धडकेत एक दुचाकीस्वार रस्त्याकडेला जाउन पडतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरला होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहताना जरी मजा वाटत असली तरी, ज्याला या पालव्याची धडक बसते. त्याला मात्र दिवसाही तारे दिसल्याशिवाय राहत नाहीत.

या पालव्याचा अचानक कुणाला प्रसाद मिळू नये म्हणून मौजे ग्रामपंचायत, नौकुड ता. गडहिंग्लज नावाचा सावधान! सावधान! सावधान! लक्ष्मी देवाचा पालवा गाडी धारकांना मारत आहे. याची सर्वानी नोंद घ्यावी म्हणून फलकच प्रसिध्द केल्याने हा पालवा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. एकुणच यातून वाहनधारकांना अॅलर्ट करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER