हा भारताच्या संघाच्या ऊर्जेचा आणि विजयाच्या उत्कट संकल्पाचा साक्षात्कार – नरेंद्र मोदी

Indian team - Narendra Modi

दिल्ली :- भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात ऐतिसहासिक विजय मिळवून भारताने मालिका खिशात घातली. या विजयाचा देशभरात जल्लोष सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्विट करून आनंद व्यक्त करत भारतीय संघाचे कौतूक करून अभिनंदन केले.

ही बातमी पण वाचा : व्वा..टीम इंडिया…व्वा! कम्माल केली!!

मोदींनी ट्विट केले – भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयामुळे आपण सर्व खूप खूश आहोत. यात भारतीय संघाची ऊर्जा आणि विजयाच्या उत्कट संकल्प दिसून येतो. त्याचबरोबर त्यांचा दृढ निर्धार, उल्लेखनीय धाडस आणि दृढ संकल्प होता. संघाचे अभिनंदन. भविष्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा,‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य विजयरथ रोखत भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि झटपट धावा काढणाऱ्या ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला. या विजयासाह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला ३३ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे कठीण आव्हान पार केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER