
मुंबई :- भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर जेएनयूतील तुकडे गँगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात ‘काश्मीर मुक्त करा’चे फलक होते, त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे.
ही बातमी पण वाचा : राजकारण तापले ! शिवसेनेतर्फे झळकले #wesupportSanjayRaut चे बॅनर
हाच आहे शिवसेनेचा (Shivsena) खरा चेहरा, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. भारतात सीएएचा कायदा लागू झाल्यानंतर वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात हिंसाचाराची घटना घटली. त्यानंतर मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वर आंदोलन करत ‘स्वतंत्र काश्मीर’ची मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले.
यावरून अनेक वादांना तोंड फुटले होते. या वादात काश्मीरबद्दलचा तो फलक हातात घेऊन उभ्या असणाऱ्या तरुणीविरोधातील तक्रार मागे घेण्यात आली आहे. महेक मिर्झा प्रभू असे या तरुणीचे नाव असून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती; पण मंगळवारी मुंबई पोलिसांनी ही तक्रार मागे घेतली. याच मुद्द्यावरून भाजपाचे अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली.
वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया वर जेएनयुतील तुकडे गॅंगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात “काश्मीर मुक्त करा” चे फलक होते त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा. pic.twitter.com/o3LlPB7Wi5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 29, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला