शाहिद कपूरने लग्नाआधी मीरा राजपूतला विचारला होता हा प्रश्न

Sahid Kappoor

लग्नाआधी जेव्हा शाहिद कपूरने आपली पत्नी मीरा राजपूतशी पहिल्यांदा भेट घेतली तेव्हा त्याने कोणता प्रश्न विचारला ते अलीकडेच सांगितले. शाहिदने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मीराला जेव्हा भेटलो तेव्हा ते दोघे दोन वेगवेगळ्या मोठ्या सोफ्यावर बसले होते. त्यावेळी तेथे या दोघांखेरीज दुसरे कोणी नव्हते. त्यावेळी शाहिदने विचार केला की आपण १५ मिनिटेसुद्धा सोबत राहू शकतो?

यानंतर शाहिदने मीराला विचारले की, तुला तुझ्यापेक्षा वयाने इतक्या मोठ्या माणसाशी लग्न का करायचे आहे? त्याला उत्तर म्हणून मीरा म्हणाली, तुला तुझ्यापेक्षा वयाने इतक्या लहान मुलीशी लग्न का करायचे आहे?

सांगण्यात येते की जेव्हा दोघांचे लग्न झाले होते तेव्हा शाहिद ३४ वर्षांचा होता आणि मीरा २१ वर्षांची होती.

शाहिद म्हणाला होता- मीरा बेस्ट आहे

एकदा नो फिल्टर नेहा चॅट शो दरम्यान शाहिदने दोघांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले होते की, ‘आम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही विषयावर भांडणे सुरू करतो. पण मीरा माझ्या आयुष्यात आहे याचा मला आनंद आहे. मला माहित आहे की ती माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. बरं मीही तिच्यासाठी चांगला आहे ‘.

सासूनेही कौतुक केले होते

एका मुलाखतीत शाहिदची आई नीलिमा मीराविषयी म्हणाली, “मीराने संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवले आहे. मीराने शाहिद आणि संपूर्ण कुटुंबाला खूप प्रेम आणि आनंद दिला आहे. ‘

नीलिमा पुढे म्हणाली, ‘जेव्हा शाहिदने मीराला पसंत केले, तेव्हा मी तिला भेटायला गेले. मला मीरा खूप गोड आणि तरुण दिसली. मला वाटलं की ती एक लहान मूल आहे, खूपच गोंडस आणि भोळी. पण त्यानंतर मीराने कुटुंबीयांना चांगलेच सांभाळले. मीराने स्वत: ला खूप चांगले सांभाळले. माझे कुटुंब आता पूर्ण झाले आहे. ‘

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER