संविधानाचे रक्षण हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली: खा. अशोक चव्हाण

महापरिनिर्वाण दिनी काँग्रेसची ‘संविधान बचाओ’ दिंडी

Ashok Chavan

दर्यापूर (अमरावती ) :- देशात पसरलेल्या जातीवादाचा विरोध करण्याकरिता व संविधानाचे रक्षण करण्याकरिता काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून, बाबासाहेबांचे जातीवादाविरोधातील विचार व त्यांनी दिलेल्या संविधानाचे प्राणपणाने रक्षण करणे, हीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Ashok Chavanकाँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथा टप्प्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरूवात आज महापरिनिर्वाण दिनी अमरावती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. संघर्ष यात्रा दर्यापूर शहरात पोहोचल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संविधानाची प्रत ठेवलेली पालखी खांद्यावर घेऊन बसस्थानक चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत ‘संविधान बचाओ’ दिंडी काढण्यात आली. या दिंडीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री वसंत पुरके, आ. विरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत माजी, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा, शाम उमाळकर, अनंतराव घारड, मदन भरगड, चिटणीस शाह आलम, प्रदेश प्रवक्ते सुधीर ढोणे यांच्यासह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व हजारो नागरिक सहभागी झाले होते.

Ashok Chavanयावेळी पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने कायम संविधानाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मनुस्मृतीसारखा ग्रंथ असताना संविधानाची गरजच काय? असे भाजप व संघाचे मत आहे. संविधानाबद्दल आदर नसल्यानेच आज देशामध्ये संवैधानिक संस्थांचे अवमूल्यन आणि संविधानाने प्रदान केलेल्या मुलभूत अधिकारांची पायमल्ली होते आहे. गेल्या चार वर्षात मोठा संविधानाला धोका निर्माण झाला असून, संविधान रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रतिकात्मक जनजागृती म्हणून काँग्रेसने ‘संविधान बचाओ दिंडी’ काढल्याचे खा. अशोक चव्हाण म्हणाले. देशातील संविधान बदलून येथील कारभार मनुस्मृतीप्रमाणे चालावा, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मानस आहे. संघाच्या इशाऱ्यावर विद्यमान सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करते आहे. देशाचे संविधान धोक्यात आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देशाचे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतील. संविधान बदलण्याचा भाजपचा डाव काँग्रेस पक्ष कधीही यशस्वी होऊ देणार नाही. देशातील नागरिकांनीही लोकशाहीच्या रक्षणासाठी संविधानाची पालखी खांद्यावर घ्यावी, हीच यामागील भावना असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.Ashok Chavan