डाव्यांच्या गडाला सुरुंग लावणाऱ्या ममता दिदींचा असा आहे राजकीय प्रवास.

This is the political journey of Mamata Didi, who undermined the fort of the Left.

पश्चिम बंगालच्या निवडणूकांमुळं  (West Bengal elections)सध्या वातावरण तापलंय. ममतांना त्यांचा गढ वाचवायचा आहे तर भाजपसाठी (BJP)बंगाल जिंकणं प्रतिष्ठेचा विषय बनलाय. ममतांचे जवळचे सहकारी ममतांची साथ सोडताना दिसायेत. ममतांचे कधीकाळी विश्वासू असणारे आणि तृणमुलचे पहिल्या फळीतले नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममतांविरुद्ध दंड थोपटलेत. ते ममतांच्या विरोधात नंदिग्राममधून भाजपच्या तिकीटावर मैदानात उतरलेत.

नंदिग्राममधून ममता अर्ज भरण्यासाठी गेल्या त्यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांनी या हल्ल्यामागं भाजप असल्याचे आरोप केलेत.

ममतांवर झालेला हा पहिला हल्ला नाही. त्या नेतृत्व करत असलेल्या मोर्च्यावरही एकदा असा हल्ला झाला होता. ज्यात युवक काँग्रेसचे ११ लोक मारेले गेले होते. या हल्ल्यानंतर ममतांच नेतृत्वाला अधिकची धार चढली होती.

पश्चिम बंगालच्या पहिल्या मुख्यमंत्री बनण्याचा मान ममतांनी पटकावला खरा पण मार्ग इतकाही सोप्पा नव्हता. ममतांचं बालपण अभावात गेलं. मुलभूत गरजाही पुर्ण करता येणार नाहीत इतकं दरिद्र्य त्यांनी पाहिलं. त्यांच्या वडीलांना उपचारा अभावी मरताना ममतांनी पाहिलं होतं.

संघर्षाची वृत्ती सोडली तर ममतांकडे हरण्यासारखं काहीच नव्हतं. या वृत्तीनं त्यांना बळ दिलं उभं राहण्याच. लढण्याचं झुंझण्याचं. या लढवय्या प्रवृत्तीनच त्यांना एका राज्याचं सर्वेसर्वा बनवलं.
५ जानेवारी १९५५ ला ममतांचा बॅनर्जींचा कलकत्त्यात जन्म झाला. प्राथमिक शिक्षणाला इथूनच सुरुवात झाली. त्या ९ वर्षाच्या असताना त्यांचा वडीलांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांनी मोठ्या कष्टातून वाट काढत जोगोमाया विद्यापीठातून ग्रॅज्यूएशन आणि कलकत्ता विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्यूएशन पुर्ण केलं. जोगेश्वरी विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवीही मिळवली.

१५व्या वर्षी काँग्रेससोबत जोडल्या गेल्या

७०च्या दशकात वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी काँग्रेसशी ममतांनी स्वतःला जोडून घेतलं. १९७६ला त्यांनी पदाधिकाऱ्याच्या रुपात राजकारणात पुर्णतः सक्रिय झाल्या. त्या बंगाल महिला काँग्रेसच्या सचिव होत्या.

जायंट किलर ममता

१९८४च्या लोकसभा निवडणूकीत ममतांना सीपीआयचे दिग्गज नेते सोमनाथ चॅटर्जी यांच्याविरुद्ध त्यांना तिकीट मिळालं. ही जागा आपण जिंकू शकत नाही याची खात्री काँग्रेसला होती म्हणून या महिला नेत्याला दिलं म्हणून तिकीट काँग्रेसनं दिलं. ममतांनी स्वतःच सर्वस्व पणाला लावलं. राजकीय कौशल्या दाखवत त्यांनी चॅटर्जींचा पराभव केला. त्यावेळी सर्वात तरुण खासदार म्हणून त्यांनी संसदेत प्रवेश मिळवला.

सोमनाथ चॅटर्जी यांची संसदेत दहशत होती. ते संसदेत बोलयला उभे राहिले तर भलेभले गारद होत. ममतांनी त्यांचा पराभव केला. चॅटर्जींची दहशत जिंकणाऱ्या ममतांना त्यावेळी पासून जायंट किलर या नावानं राजकीय वर्तूळात ओळखलं जाऊ लागलं. पुढं त्या १९९१ला खासदार झाल्यानंतर त्यांना केंद्रीय मानवसंसाधन मंत्रालयाची जाबादारी मिळाली.

फायर ब्रँड नेतृत्त्व

ममतांनी रस्त्तावर उतरुन राजकारण करुन जनतेच्या मनात मोठं स्थान निर्माण केलं होतं. ममता तापट स्वभावाच्या आहेत. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या गाडीच्या बोनेटवर चढून आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळं सुरुवातीच्या काळात त्यांना सामान्य कार्यकर्त्याची इमेज तोडून बंगालच्या राजकारणात नेता म्हणून प्रस्थापित व्हायला मदत झाली.

परत या इमारतीत पाय ठेवणार नाही

ममता युवकांच्या मोर्चाचं नेतृत्व करत होत्या हा मोर्चा कलकत्त्यातल्या ‘रॉयटर्स बिल्डींग’च्या दिशेनं येत होता. रॉयटर्स बिल्डींगमध्येच मुख्यमंत्री कार्यालय होतं. तेव्हा डाव्यांची सत्ता होती. आंदोलनाला विक्राळ रुप आलेलं पाहून पोलिसांची आंदोलकांशी झडप झाली.

आंदोलनकर्त्यांवर गोळीबार झाला. यात ११ कार्यकर्ते मारले गेले. पोलिसांकडून त्यांना अपमानकारक वागणूक मिळाली. त्यांचे केस ओढले गेले. तेव्हा ममतांनी शपथ घेतली. की परत या बिल्डींगमध्ये पाऊल ठेवणार नाही. पण नियतीच्या मनात काही वेगळाच डाव होता.

ममता त्या बिल्डींगमध्ये १८ वर्षांनी परतल्या बंगलच्या मुख्यमंत्री बनून.

ममतांनी कधी भाजपची साथ घेतली तर कधी काँग्रेसची. नंतर त्यांनी स्वतःच्या तृणमुल काँग्रेसची स्थापना केली. डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या बंगाल स्वतःच्या ताकदीवर जिंकला. २०१४च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी मायावती, जयललितांना एकत्र करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. २०१९च्या लोकसभेत मोदींच्या विरोधात ममता सक्षम नेतृत्व होऊ शकतात, असंही बोललं गेलं.

पश्चिम बंगालची यंदाची निवडणूक चुरशीची बनतीये. ममतांवर झालेल्या हल्ल्यामुळं वेगळं वळण या निवडणूकीला लागेल का? याचे कयास लावले जातायेत. पश्चिम बंगाल भाजपच्या हातात येईल की ममतांचा गड अबाधित राहील याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER