गावस्करचा दुहेरी शतक झळकावणारा हा एकमेव अतूट विक्रम

सुनील गावस्करने कसोटी क्रिकेटमध्ये चार दुहेरी शतके ठोकली होती पण ही चार शतके त्याने वेगवेगळ्या डावात ठोकली होती

Sunil Gavaskar

सुनील गावस्कर यांच्या नावावर अनेक नोंदी आहेत. कसोटी सामन्यात १०,००० धावा करणारे ते पहिले फलंदाज आहेत.  तर पदार्पण कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा (७७४) करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. या सर्व विक्रमाशिवाय त्यांनी असाही एक विक्रम केला होता, जो आजपर्यंत तुटलेला नाही. कसोटी क्रिकेटच्या चारही डावांत  दुहेरी शतक झळकावणारे ते जगातील एकमेव फलंदाज होते. सर डॉन ब्रॅडमन यांनी  कसोटी क्रिकेटमध्ये १२ दुहेरी शतके ठोकली होती; परंतु त्यांना हे यश मिळवता आले नाही.

गावस्कर यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत केवळ चार दुहेरी शतके ठोकली होती; परंतु ही सर्व दुहेरी शतके त्यांनी  कसोटी क्रिकेटच्या वेगवेगळ्या डावात केली होती. त्यांनी  पहिले द्विशतक(२२०) त्यांच्या पदार्पण कसोटी मालिकेतच १९७१ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातील तिसर्‍या डावात बनवले होते. यानंतर दिग्गज सलामीवीराने १९७८ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध मुंबई येथे झालेल्या सामन्याच्या पहिल्या डावात २०५ धावा केल्या आणि त्यानंतर एका वर्षानंतर इंग्लंडविरुद्धच्या ओव्हलमधील सामन्याच्या चौथ्या डावात २२१ धावांची मॅरेथॉन डाव खेळला होता.

ही बातमी पण वाचा : Bday Special : वानखेडे स्टेडियमकडून सुनील गावस्कर यांना वाढदिवसाच्या दिवशी “लाइफटाइम गिफ्ट” देण्यात आला

गावस्कर यांनी  शेवटचे दुहेरी शतक (नाबाद २३६) १९८५ मध्ये चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याच्या दुसर्‍या डावात बनवले होते. सामन्याच्या तीन डावांत दुहेरी शतक झळकावणार्‍या सहा फलंदाजांपैकी ब्रॅडमन एक आहेत. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूने पहिल्या तीन डावांत  सर्व १२ दुहेरी शतके ठोकली; पण सामन्याच्या चौथ्या डावात त्यांची सर्वाधिक धावसंख्या नाबाद १७३ अशी होती.

गावस्करांच्या विक्रमाशी जुळण्यासाठी सर्वांत जवळ श्रीलंकेचा कुमार संगकारा पोहचला होता, ज्याने पहिल्या तीन डावांमध्ये कारकीर्दीत सर्व ११ दुहेरी शतके ठोकली होती. तो २००७ मध्ये होबार्ट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या डावात दुहेरी शतक झळकावण्याच्या जवळ आला होता; पण जेव्हा तो १९२ धावांवर खेळत होता तेव्हा पंचांच्या खराब निर्णयामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परत जावे लागले होते.

कसोटी क्रिकेटच्या तीन डावांमध्ये दुहेरी शतक झळकावणाऱ्या अन्य फलंदाजांमध्ये युनिस खान, एलिस्टेयर कुक, ब्रैंडन मैकुलम आणि  गॉर्डन ग्रीनिज यांचा समावेश आहे. आपल्या कारकीर्दीत चार किंवा त्याहून अधिक दुहेरी शतके ठोकणार्‍या बहुतेक फलंदाजांनी सामन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या डावात ही आश्चर्यकारक कामगिरी केली. यात वॉली हैमंड, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, राहुल द्रविड़, वीरेंद्र सहवाग, विराट कोहली, रिकी पोंटिंग, माहेला जयवर्धने आणि  मार्वन अटापट्टू यांचा समावेश आहे. मोहम्मद युसूफने सामन्याच्या दुसर्‍या डावात आपली चारही दुहेरी शतके केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER