… हे तर सत्तेचे लाचारी; हिंदुत्वावरून शेलारांचा शिवसेनेला टोमणा

Ashish Shelar - Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यभरातील मंदिरं  उघडा  या मागणीसाठी भाजपाने (BJP) आज राज्यव्यापी आंदोलन केले. अनेक ठिकाणी भाजपाचे नेते व पदाधिकारी आंदोलनात उतरले होते. या संदर्भात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका सुरू आहे. भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्यात काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीबरोबर (NCP) सत्तेत असलेल्या शिवसेनेला (Shiv Sena) टोमणा मारला – हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!

ट्विटमध्ये शेलार म्हणतात – जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये “शेजारी-शेजारी” बसलेत. त्यांनीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमिपूजन ई-पद्धतीने करा, असे अनाहूत सल्ले दिले होते. “भारत तेरे तुकडे हो हजार” म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले. त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली, याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना ज्यांनी मुंबईचे पालकमंत्री केले, पंढरपुरात जाऊन ज्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्शही केला नाही, ते कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!

बार उघडले, रेस्तराँ उघडले मग मंदिरं आणि मशिदी बंद का? धर्मस्थळं बंद का? असा प्रश्न भाजपाच्या आंदोलकांनी राज्य सरकारला केला आहे. बार आणि रेस्तराँ सुरू  करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरं बंद ठेवताना लाज वाटत नाही का? असाही प्रश्न या आंदोलकांनी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER