देशाचे गृहमंत्री आल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसैनिकाला दिलेली ही भेट आहे ; शिवसेनेचे राणेंना प्रत्युत्तर

Uday Samant - Amit Shah - Nitesh Rane

मुंबई : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यामध्ये वैभववाडी नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्याच उपस्थित शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. त्यानंतर राणे पुत्रांनी पुन्हा शिवसेनेवर प्रहार केला व हे उद्धव ठाकरेंना व्हॅलेन्टाईन गिफ्ट असल्याचे म्हटले होते. राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च-तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

देशाचे गृहमंत्री आल्यानंतर भाजप (BJP) समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश व्हावा यातच सर्व आले. कोण काय बोलण्यापेक्षा सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांनी भाजपला दिलेलं हे उत्तर आहे, असं उदय सामंत म्हणाले.

तसेच, सामंत यांनी राणेंवर लक्ष्य साधत, भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांचे घुसणे, मारणे याच्या पलिकडे संवादच होऊ शकत नाही. वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीला चित्र स्पष्ट होईल. असेही म्हणाले.

सामंत म्हणाले, विकासाच्या दृष्टीने नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याची जी काही पोचपावती द्यायची आहे ती नगरपालिका निवडणुकीत ते देतील. वैभववाडीची नगरपंचायत शिवेसेनेच्या ताब्यात येईल”, असा दावा सामंत यांनी केला.

“प्रत्येक ट्विटवर प्रतिक्रिया द्यावी, असं मला वाटत नाही. देशाचे गृहमंत्री आल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसैनिकाला दिलेली ही भेट आहे. कुणीही कितीही वल्गना केल्या तरी शिवसेना संपू शकत नाही. शिवसेना समोरच्याला संपवू शकते. हे सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांनी करुन दाखवलं आहे”, अशा शब्दांत उदय सामंत यांनी राणेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर शिवसेनेने भाजपला मोठा झटका दिला आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडी नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकिय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर हा पक्षांतराचा कार्यक्रम पार पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER