पुरुषांच्या टेनीसमध्ये 2003 नंतर पहिल्यांदाच घडलेय असे काही…!

Mens Tennis - Maharashtra Today

पुरुषांच्या टेनिसमध्ये (Tennis) बिग थ्री (Big Three) म्हणजे राॕजर फेडरर, राफेल नदाल व नोव्हाक जोकोवीच यांची हुकूमत संपत असल्याची आणि नवी पिढी जोमाने पुढे येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यंदा गेल्या सलग चार मास्टर्स (Masters) स्पर्धांपैकी एकही बिग थ्री जिंकू शकलेले नाहीत. पॕरिस, मायामी, माँटे कार्लो आणि आता माद्रिद मास्टर्स स्पर्धेतही या तिघांपेक्षा वेगळाच खेळाडू विजेता म्हणून समोर येणार आहे.

पुरुषांच्या व्यावसायिक टेनिसमध्ये तब्बल 2003 नंतर प्रथमच असे घडतेय. 2003 मध्ये प्रत्येक मास्टर्स स्पर्धांचा या तिघांपैक्षा वेगळाच विजेता होता आणि त्यावेळी जोकोवीच 16 वर्षांचा आणि नदाल 17 वर्षांचा होता.

माद्रिद मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत अॕलेक्झांडर झ्वेरेव्हने राफेल नदालचे आव्हान 6-4, 6-4 असे संपवले आणि सलग चौथ्या मास्टर्स स्पर्धेत बिग थ्री पैकी कुणीच विजेता नसेल हे स्पष्ट झाले. 2003 मध्ये अँडी राॕडीकने कॕनडा व सिनसिनाटी मास्टर्स, युआन कार्लोस फेरेरोने माद्रिद आणि टीम हेनमनने पॕरिस मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. त्यावर्षीच्या नऊच्या नऊ मास्टर्स स्पर्धा बिग थ्री शिवाय वेगळ्या खेळाडूंनी जिंकल्या होत्या. फेडररनेआपली पहिली मास्टर्स स्पर्धा जिंकली ती 2004 मध्ये इंडियन वेल्सला. आणि तेंव्हापासून फेडरर-नदाल- जोकोवीच या तिघांपैकीच कूणी ना कूणी सलग तीन मास्टर्स स्पर्धातील एखादी तरी स्पर्धा जिंकलेलीच आहे. ही मालिका यंदा खंडीत झाली (2020 चा कोरोना व्यत्यय हा अपवाद).

सध्या जोकोवीचने गेल्या सप्टेंबरमध्ये रोम मास्टर्स जिंकली होती. त्यानंतर पॕरिस मास्टर्समध्ये दानिल मेद्वेदेव, मायामी मास्टर्समध्ये ह्युबर्ट हुर्काक्झ आणि माँटे कार्लोत स्टेफानौस सीसीपास विजेते ठरले तर आता माद्रिद मास्टर्सची विजेतेपदाची लढत अॕलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि मॕटिओ बेरेंटीनी यांच्यात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button