ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब आहे – देवेंद्र फडणवीसांची टीका

CM Uddhav Thackeray - Devendra Fadnavis

मुंबई :- माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला. फडणवीस यांनी राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरोना (Corona) लस मोफत द्यावी, अशी मागणी केली. यावर केंद्र सरकार राज्याला निधी देत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असता फडणवीस यांनी ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब असल्याचं म्हणत टीका केली. ते ठाण्यात बोलत होते .

लसी संदर्भात सर्व प्रोटोकॉल केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ठरवले आहेत. पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करला लस मोफत मिळणार आहे. आमची अपेक्षा अशी आहे की अनेक राज्यांनी सर्वांना लस मोफत देणार हे घोषित केले आहे. महाराष्ट्राने देखील केंद्र सरकारची मदत घ्यावी. किमान गरीब आणि मध्यम वर्गाला ही लस मोफत द्यावी, अशी आमची मागणी आहे.

मी मागील वर्षी देखील या देवीच्या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडत असतात. एकिकडे मातेचा आशीर्वाद घेत असताना आपण मातांना शक्ती रुपी मानले आहे. कोरोना काळात मोठे संकट आले असताना भारतात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यामार्फत आपण नियमांचे पाळन केले. वेगवेगळ्या उपाय योजना आपण करत आलो.

कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रामध्ये बघितले. समाजाच्या अनेक क्षेत्रातून अनेकांनी कामे केली. जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रामध्ये 54 लाख लोकांपर्यंत शिधा वाटप करावे लागेल असं सांगितलं. त्यावर आपण काम केले . त्यामुळे या गंभीर परिस्थितीत आपण संकटाला तोड देत काम केलं. त्यामध्ये नवदुर्गांनी देखील चांगले काम केले. समाजात जे चांगले काम करतात त्यांचे कौतुक झाले पाहिजे. मी या ठिकाणी सर्वांचे अभिनंदन करतो. कोरोना काळात सेवा करणाऱ्या या आई चरणी कोरोना दूर होवो अशी प्रार्थना करतो. या आईची शक्ती घेऊन जोमाने काम करूयात,असेही फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचा भाजपला सर्वात मोठा धक्का; ११ नगरसेवक शिवबंधनात अडकणार, नाशिकची सत्ता जाणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER