हे तर ‘थापडो सरकार’, केशव उपाध्ये यांची टीका

Keshav Upadhye - Mahavikas Aghadi

मुंबई :- राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) जनतेसाठी ‘आपडो सरकार’ नसून थपडा खाणारे व थापा मारणारे ‘थापडो सरकार’ झाले आहे, अशी टीका भाजपाचे (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केली. अनेक ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली.

उपाध्ये म्हणाले, “न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर थपडा मिळत आहेत. तसेच जनतेला राज्यातील आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या आश्वासनाच्या थापा पहात असतां हे आघाडीचे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे”.

ही बातमी पण वाचा : चंद्रकांत पाटलांच्या गावात आघाडीत बिघाडी ; थेट अजित पवारांनी घेतली दखल  

न्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ती मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर, वाढतच आहे. कालच विजय वड्डेवारीवार यांचा पासपोर्ट खोटी माहिती दिली म्हणून जप्त केला गेला. अन्य एक मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेली शिक्षा, नियमबाह्य पध्दतीने परवानग्या दिल्या म्हणून वर्षा गायकवाड यांचा निर्णय बेकायदेशीर ठरविण्याचा काल आलेला निर्णय ताजा आहे. त्याशिवाय पदवी परिक्षा, ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक, मेट्रो कारशेड, अर्णब गोस्वामी, कंगना प्रकरणात न्यायालयाकडून सरकारला मिळालेल्या थपडा तसेच मराठा आरक्षणप्रकरणी (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) बाजू मांडण्यात आलेले अपयश ही सुध्दा थप्पडच आहे, अशी टीका उपाध्ये यांनी सरकारवर केली.

हे सरकार कंत्राटदाराना खैरात, बिल्डरांना मलिदा आणि जनतेला मात्र फक्त थापा देते आहे. भरमसाठ वीजबिलात वारेमाप सवलत देण्याच्या थापा, शेतकऱ्यांना मदतीच्या थापा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करू ही एक थाप, पीक वीमा कंपन्याच्या अटी शेतकऱी धार्जिण्या करू, मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलतीच्या थापा अशा अनेक थापा सरकार जनतेला देत असून याची संख्याही मोठी आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारची ओळख ही थापाडे सरकार अशी झाली आहे, असे केशव उपाध्ये म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER