हा तर भाजपाचा निवडणूक जाहीरनामा; यशोमती ठाकूर यांची अर्थसंकल्पावर टीका

yashomati Thakur & Nirmala Sitaraman

मुंबई :- निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी सादर केलेला अर्थसंकल्प (Union Budget 2021) म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा (BJP) आहे, अशी टीका राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केली.

ठाकूर यांनी ट्विट केले – ‘ सीतारामण   यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा आहे. ज्या राज्यात निवडणुका तिथे मोठमोठ्या आकड्यांचे पॅकेज द्यायचे.’

मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली

सरकारला सर्वाधिक कर मुंबईतून मिळतो. मुंबई आणि महाराष्ट्र अनेकांना रोजगाराची संधी आणि स्थैर्य देतो. तरीही केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईच्या वाट्याला काहीच आले नाही! हा अर्थसंकल्प मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा आहे, अशी टीका ठाकूर यांनी केली.

कोरोना लसीचा उल्लेख नाही
राज्यात काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणचा कार्यक्रम सुरू झाला. लस सर्वसामान्यांना निःशुल्क देण्यात येणार की नाही, याबाबतची कोणतीही घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. तसेच या बजेटमधून कामगार वर्गासाठीही कोणत्याही घोषणा करण्यात आल्या नाहीत. फक्त रोजगार पोर्टल बनवण्याची घोषणा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असे ठाकूर म्हणाल्यात.

करदात्या मध्यमवर्गाची निराशा
बजेटमधून करदाता असलेल्या मध्यमवर्गाला काहीच मिळाले नाही. या वेळेस स्लॅब बदलेल, अशी आशा होती; पण अर्थमंत्र्यांनी घोर निराशा केली, अशी टीका त्यांनी केली.

ही बातमी पण वाचा : ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’, अर्थसंकल्पावरुन संजय राऊतांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER