ही तर ‘मद्यविकास आघाडी’! : आचार्य तुषार भोसलेंचा टोमणा

Uddhav Thackeray - Acharya Tushar Bhosale

कोरोनाच्या (Corona) टाळेबंदीच्या काळात दारुची दुकाने बंद होती त्यामुळे दारूविक्रेत्यांचे नुकसान झाले. दारू दुकानदारांना मदत करण्यासाठी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दारूच्या दुकानांचे परवाना शुल्क ५० टक्के कमी करण्याचा निर्णय झाला. यासाठी आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi), ही तर मद्यविकास आघाडी, असा टोमणा मारला.

सरकारने अनलॉकच्या प्रक्रियेत सर्वात आधी दारूची दुकाने सुरू केली. मंदिरे उघडायला उशीर लावला. राम मंदिरासाठी सुरू असलेल्या निधी संकलनावर शिवसेनेने टीका केली आहे. तसेच, कोरोनाच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलात सूट मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली होती त्याचा संदर्भ घेऊन भोसले म्हणालेत, मंदिरांच्या आधी बार खुले केले, दारु घरपोच दिली! वाईन उद्योगासाठी विशेष पॅकेज आणले. एकीकडे राम मंदिराच्या लोक वर्गणीला विरोध, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही, नागरिकांना वाढीव वीजबिलात सूट मागितली तर ती नाकारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER