
मुंबई :- ताज हॉटेलला तब्बल नऊ कोटी रुपये दंड माफ करणाऱ्या महापालिकेने मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर (बीएसई) मात्र कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘बीएसई’ला दोन कोटी रुपये दंड भरण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. यावरून महापालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर (Shiv Sena) भाजपाचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी निशाणा साधला आहे.
ही बातमी पण वाचा : शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का? किरीट सोमय्यांचा सवाल
शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की , टाटांच्या हॉटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने ‘बीएसई’वर (BSE) मात्र कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला…तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???… वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!! ,असे ट्विट आशिष शेलार यांनी करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
टाटांच्या हाँटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने “बीएसई” वर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय.
महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला…
तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???…वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 4, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला