हा आहे शिवसेनेचा नवब्रिगेडी हिंदुत्ववाद; आ. अतुल भातखळकर यांची टीका

Atul Bhatkhalkar & Kishori Pednekar

मुंबई : ‘लव्ह जिहाद’ हा केवळ भाजपाचा अजेंडा आहे. लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपाचे नेते यावरून राजकारण करू पाहात आहेत, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांचा हा आरोप ‘शिवसेनेचा नवब्रिगेडी हिंदुत्ववाद’ आहे अशी बोचरी टीका भाजपाचे आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली.

भाजपावर लव्ह जिहादवरून टीका करताना पेडणेकर म्हणाल्या – भाजपा या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करते आहे. लव्ह जिहाद कुठे झाला आहे हे आम्ही भाजपाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपाचे नेते यावरून केवळ राजकारण करू पाहात आहेत.

भातखळकर यांनी ट्विट केले – “अलीकडे शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचे विचार बासनात गुंडाळून कन्हैयाकुमार, उमर खालिद यांच्या विचारावर चालण्याचा निश्चय केलेला दिसतो आहे नवब्रिगेडी हिंदुत्ववाद…” सध्या विविध राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कायद्याच्या चर्चांना जोर आला आहे.

उत्तरप्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने लवकरच लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. मध्यप्रदेश सरकारदेखील आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER