हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे; खतांच्या दरवाढीने शरद पवार संतापले

Farmers - Sharad Pawar

मुंबई :- रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाकाळात (Corona) शेतकरी (Farmers) अडचणीत सापडला आहे. रासायनिक खतांची दरवाढ म्हणजे ‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे’ आहे असा संताप व्यक्त करून ही दरवाढ मागे घ्या, अशी मागणी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. इंधनाच्या दरवाढीबाबतही पवार यांनी टीका केली असून यामुळे कोरोना साथीच्या संकटकाळात हा निर्णय धक्कादायक आहे. यावर त्वरित पुनर्विचार करा, अशी सूचना त्यांनी केली.

दादा भुसे
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनीही केंद्रीय केमिकल आणि फर्टिलायझर मंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले आहे. कोरोनाच्या साथीमुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहे. रासायनिक खतांच्या किमतीत झालेली वाढ अव्वाच्या सव्वा आहे, शेतकऱ्याला परवडणारी नाही. बऱ्याच खतांच्या किमतीत ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता ही दरवाढ तातडीने मागे घ्या, अशी विनंती कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली होती.

Discalimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button