… हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचा पुरावा; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

CM Uddhav Thackeray - Chitra Wagh

मुंबई : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे (Gajanan Marne) याची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर तो मंगळवारी तळोजा कारागृहातून बाहेर आला होता. यानंतर गजानन मारणे समर्थकांनी त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढली होती. याच मुद्द्यावरून भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला.

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळात खून किंवा बलात्कार ही एखाद्या सामान्य घटनेसारखी बाब झाली आहे. पण आता तुरुंगातून सुटल्यावर नामचीन गुंड मिरवणूक काढायची हिंमत करू लागले आहेत. हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचा पुरावा आहे, अशी टीका वाघ यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER