‘ही उपास करण्याची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा; कोरोनाकाळात देवही वाचवणार नाही’

Sanjay Gaikwad

बुलडाणा :- शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहेत. ‘ही उपास-तपास करण्याची वेळ नाही, कोरोना (Corona) काळात देवही वाचवायला येणार नाही’ असं विधान त्यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं. त्यांच्या या विधानावरुन वारकरी संप्रदायाने संताप व्यक्त केला आहे. याबद्दल अनेकांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

यात एका वारकऱ्याने आमदार संजय गायकवाड यांना फोन केल्यानंतर त्यांच्यासोबत अर्वाच्च भाषेत त्यांनी संवाद साधल्याची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. हे बेताल वक्तव्य करून आतापर्यंत सनातन हिंदू समाजाने शाकाहार सोडून मांसाहारकडे वळावं असं दिसतं. संजय गायकवाड यांनी माफी मागतली पाहिजे अन्यथा राज्यातील सर्व वारकरी मंडळी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे.

तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. पण मी रोज २०-२५ जणांचे मृतदेह जाळू लागलो, तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहिती आहे. पण मी जे बोललो ती वास्तविकता आहे. मी पण नास्तिक नाही परंतु काळाची गरज आहे म्हणून बोललो. तुम्ही सगळ्या महाराजांनी वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही सगळे एकत्र या मग बघू. आमचं लॉकडाऊन ३० मे ला उठतंय, ३१ मे ला तुम्ही सिंदखेडराजाला या मग आमनेसामने बघू काय होतं? असंही संजय गायकवाड बोलत असल्याचं ऐकायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button