ही वेळ टीका-टिप्पणीची नाही; राष्ट्रवादीकडून पीयूष गोयल यांच्या कामाचे कौतुक

Praful Patel-Piyush Goyal

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रविवारी संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाकडून मागणीपेक्षा कमी रेल्वेगाड्या सोडण्यात येत असल्याचं सांगत त्यांनी केंद्राकडून होणाऱ्या दिरंगाईवर टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

रेल्वेला देशभरात गाड्या चालवायच्या आहेत. त्यांच्यावर इतका भार असूनही चांगलं काम सुरू आहे.  रेल्वे मंत्रालयाच्या कामाची तारीफ करायला हवी. आजच्या घडीला टीका-टिप्पणी करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : “फक्त गोरखपुरची ट्रेन ओडीसीला पोहचवू नका”; मध्यरात्री यादी मागणाऱ्या रेल्वेमंत्री गोयल यांना राऊतांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल हेदेखील उपस्थित होते. कोणत्याही महत्त्वाच्या राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राज्यपालांनी शरद पवारांना भेटायला बोलावले होते. त्यानंतर जवळपास २० मिनिटे ही बैठक चालली. पण बैठक फक्त सदिच्छा भेट होती. यात कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असे पटेल यांनी सांगितले आहे.


Web Title : This is not a time for criticism, ncp appreciate piyush goyals work

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER