हे तर कलंकनाथ आणि राक्षस; इमरती देवीचा संताप

Kamal Nath & Imarti devi

भोपाळ : मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना ‘आयटम’ म्हणालेत. यावर संताप व्यक्त करताना इमरती देवी म्हणाल्या – हे तर कलंकनाथ आणि राक्षस आहेत.

इमरती देवी म्हणाल्या, कधी काळी कमलनाथ यांना मी मोठा भाऊ मानत होती. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझा अपमान केला. आम्ही भेटायला गेल्यानंतर ते सगळ्यांवर डाफरले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत काहीही विकास केला नाही. मुख्यमंत्रीपद गेल्याने कमलनाथ यांना वेड लागले आहे.

कमननाथ यांची सारवासारव

आज एका सभेत कमलनाथ म्हणाले – मी कोणाचाही अपमान केला नाही. मी त्यांचे नाव विसरलो होतो म्हणून त्यांना आयटम म्हणालो. मी असं काही ठरवून बोललो नाही. मला त्यांचे नाव आठवले नाही. व्यासपीठावर आयनम नंबर १ आहेत राजनारायण सिंह, आयटन नंबर २ अजय सिंहजी…या यादीत आयटन नंबर १, आयटम नंबर २, आयटम नंबर ३ असे नाव आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER