हा भारताचा विजय- नितीन गडकरी

Nitin Gadkari

मुंबई : ‘लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला जनमताचा कौल हा भारताचा विजय आहे’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी देशातील जनता व भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कुशल नेतृत्वाखाली भाजप इतिहास रचला आहे’ या शब्दांत  त्यांनी भावना व्यक्त केल्या.

१७ व्या लोकसभेसाठी देशातील ५४३ मतदारसंघांत  निवडणूक झाली . त्यापैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पैशांचा अमाप वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने तामिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता असली तरी ‘विजेता कोण?’ हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा : http://bit.ly/LoksabhaResults