
भारतात विविध धर्मीय त्यांच्या त्यांच्या आस्था जपून आहेत. भारत एक विशाल राष्ट्र आहे. लोकांच्या मनातली आस्था आणि श्रद्धाच त्यांच्या जीवनाची दशा आणि दिशा ठरवत असते. अशीच एक आस्था आहे शंकराच्या पिंडीला दुग्धाभिषेक करायची. पण अनेकदा पिंडीवर चढवलेलं दुध वाहून गटारीत मिळतं आणि दुधाची मोठ्याप्रमाणात नासाडी होत असल्याचे सुर येतात. पण शंकराला अर्पण केलेलं दुध नंतर गरजवंताच्या पोटापर्यंत पोहचलं तर?
मेरठच्या पाच विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हे करुन दाखवलंय. त्यांनी एक असा जुगाड केलाय की मंदिरातल्या दररोजच्या शेकडो लीटर अभिषेक करण्यासाठी वापरलेल्या दुधाला योग्य ठिकाणी पोहवलं जाईल.
मेरठचे रहिवासी असणारे किरण गोयल यांनी त्यांचे चार मित्रांना सोबत घेत तंत्रज्ञान विकसीत केलंय. ज्या द्वारे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक म्हणून दुधाचं केलेलं अर्पण भुकेल्यापर्यंत पोहचेल. या विद्यार्थ्यांमुळ रोजचं १०० लीटर दुध गरजू मुलांना वाटण्यात येतं. धार्मिक भावनांना कोणत्याही प्रकारची इजा न पोहचवता हे शक्य असल्याचत्यांनी करुन दाखवलंय.
ही क्लुप्ती साधली कशी? असा प्रश्न विचारल्यावर करण यांनी सांगितलं, “लोक शिवलिंगावरील कलशामध्ये दुध टाकतात. या कलशाला दोन छिद्र पाडण्यात आलीयेत. एका सुनिश्चित उंचीवर कलश ठेवण्यात येतात. यांनी असं तंत्रज्ञान विकसीत केलंय ज्यामुळं सात लिटरपैकी एक लिटर दुधाने शंकराच्या पिंडीवर अभिषेक होतो आणि उरलेलं सहा लिटर दुध पाईप द्वारे दुसऱ्या भांड्यात साठवलं जाईल.
यासाठी फक्त अडीच हजार रुपये खर्च आल्याचं ते सांगतात. या उपायामुळं रोजचं १०० लीटर दुध वाया जाण्यापासून वाचवलं जातंय. मंदिरातील हे दुध नंतर ‘सत्यकाम मानव सेव समिती’तील अनाथ मुलांसाठी आणि एचआयव्हीग्रस्त मुलांचा सांभाळ या संस्थेच्यावतीनं केला जातोय.
देशभरातून या मुलांच कौतूक केलं जातंय. इतर शहरातील मंदिरांनी देखील याच अनूकरण करुन अनाथ मुलांचं पोटभरण्यासाठी या यंत्रणेचा वापर सुरु केलाय.
का केला जातो अभिषेक?
एखाद्या गोष्टी अथवा व्यक्तीच्या आदरार्थ, सन्मानार्थ, स्मरणार्थ, किंवा एखाद्याने मनोमन मागितलेली इच्छापुर्ती झाली किंवा व्हावी म्हणून अभिषेक केला जातो. अथवा समाधान आणि मागंल्याचे प्रतीक म्हणून, मूर्तीपूजेतील प्राणप्रतिष्ठा विधीच्यावेळी किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीची सुरुवात करण्यासाठी मांगल्यपूर्वक केल्या जाणाऱ्या विशेष विधींना अभिषेक म्हणून ओळखलं जातं.
या प्रसंगी वेगवेगळ्या किंवा एखाद्यचा विशिष्ट देवतांचे स्त्रोत्र मंत्र म्हणंटले जातात. असं असताना देवतेच्या मूर्तीवर दूध किंवा उसाचा रस नाहीतर पाण्याची संततधार धरुन ठेवण्याच्या क्रियेला अभिषेक पूजा असं म्हणलं जातं.
सामान्यपणे पाण्याची संततधारच जास्तवेळा मुर्तीवर धरली जाते. त्यासाठी अभिषेक पात्राची गरज असते. शंकराच्या मंदिरात गळती लावलेली असते. वसंत ऋतुत्/चैत्रात आंब्याच्या रसाचा अभिषेक देखील करतात. अभिषेक पूजा पद्धतींचा वापर हिंदू, जैन, बौद्ध धर्मांमध्ये दिसून येतो.
विविध इच्छा आकांक्षा किंवा कामना मनात धरून किंवा तसे संकल्प करून अभिषेक पूजा केली जाते. धर्मिक श्रद्धेचं आचरण करत सामाजिक जाणिवांना प्रगल्भ करण्याचा संदेश या चार मुलांनी दिला आहे. यामुळे धर्माचं खरं स्वरूप अधोरेखित झालं असल्याचं स्थानिक लोकांचं म्हणनं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला