‘सर्कस’च्या सेटवर रणवीर सिंगने असा बनविला रोहित शेट्टीचा व्हिडीओ

Rohit Shetty Video

बॉलिवूडमध्ये (Bollywood) ‘एनर्जी किंग’ म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंग (Ranveer Singh) हा अष्टपैलू अभिनेता आहे. रणवीर सिंग जितका चांगला अभिनेता आहे तितकाच मस्तीखोरदेखील आहे. अशा परिस्थितीत रणवीर नेहमीच काही तरी करत असतो, ज्यामुळे तो चाहत्यांमध्ये चर्चेत राहतो. अशा परिस्थितीत रणवीरने आता बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. वास्तविक रणवीर सिंग आजकाल रोहित शेट्टीसोबत सर्कस (Circus) चित्रपटाच्या शूटमध्ये व्यस्त आहे.

अशा परिस्थितीत रणवीरने चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून रोहित शेट्टीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये रणवीर सिंग दिसत नाही; पण त्याचा आवाज ऐकू येत आहे. रणवीर म्हणतो, ‘या देशातील सर्वांत गंभीर कार स्टंट डायरेक्टर.’ यानंतर रोहित शेट्टी व्हिडीओमध्ये मिनी कार चालवताना दिसत आहे. मिनी कार चालवून रोहित परत येताच तो रणवीर सिंगला म्हणतो, ‘अबे तू शूट कर रहा है.’ रणवीरचा हा व्हिडीओ २० लाखांहून अधिक सोशल मीडिया युझर्सनी पसंत केला आहे. रोहित शेट्टीच्या या व्हिडीओतील खास गोष्ट म्हणजे तो मिनी कार चालवत आहे, तर मोठी कार सेटवर उपलब्ध आहे.

सांगण्यात येते की, रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर जर आपण रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं तर तो रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातही कॅमिओ करताना दिसणार आहे. सूर्यवंशीमध्ये रणवीरसोबत अजय देवगणदेखील कॅमिओमध्ये दिसणार असून चित्रपटात अक्षयकुमार आणि कैटरीना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सर्कस आणि सूर्यवंशी यांच्याव्यतिरिक्त रणवीर सिंगचा ‘जयेश भाई जोरदार’ हा चित्रपट आहे, ज्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER