अशी ही पळवापळवी : भिवंडीतील काँग्रेसचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत

Congress-NCP

महाराष्ट्र टुडेने कालच लिहिले होते की, भाजपचे कार्यकर्ते, नेते कमीच फुटतील; पण महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीन पक्षच एकमेकांचे कार्यकर्ते, नेते पळवतील. हे लिहिण्यास २४ तासही उलटायचे असताना या गोष्टीचा प्रत्यय आज भिवंडी महापालिकेत आला. भिवंडीतील काँग्रेसच्या तब्बल १६ नगरसेवकांनी मुंबई येथील मुख्य कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणखी दोन काँग्रेस नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ९० नगरसेवक संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ ४७ इतके होते आणि या पक्षाला स्पष्ट बहुमत होते. मात्र अलीकडे महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी पक्षाला ठेंगा दाखवला. कोणार्क विकास आघाडी व भाजपशी हातमिळवणी केली आणि कोणार्क विकास आघाडीच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती. बुधवारी राष्ट्रवादीत सामील झालेले १६ नगरसेवक हे पक्षाला महापौरपदाच्या निवडणुकीत ठेंगा दाखविणाऱ्यांपैकीच आहेत.

१९९५ ते १९९९ या काळात राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार होते आणि त्यावेळी एकमेकांच्या पक्षात फोडाफोडी करायची नाही, असा अलिखित करार होता व तो अनेक वर्षे पाळला गेला. मात्र नंतर या दोन पक्षांमधील तो करार मोडला गेला. आता महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे असा करार करतील असे दिसत नाही. उलट एकमेकांची माणसं फोडण्यावर भर दिला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER