‘नेमके हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय’ : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारने कोश्यारींना दिलेले भाषण एखाद्या चौकातले वाटते. यात यशोगाथाच नव्हे, तर केवळ व्यथाच दिसतात, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले.

ठाकरे सरकारला कोरोना (Corona) हाताळण्यात अपयश आला आहे, असा दावा फडणवीस यांनी आकडेवारीसह केला. “देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ९ टक्के लोकसंख्या आपल्या राज्यात आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी ३३ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातील कोरोना रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण राज्यात आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या मोठी आहे. सध्या राज्यात ४६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.” अशी आकडेवारी फडणवीस यांनी विधानसभेत सांगितली. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरही त्यांनी टीका केली.

सरकार फक्त फेसबुक लाईव्हमध्ये मग्न आहेत. २१ फेब्रुवारी २०२१ चे फेसबुक लाईव्ह उत्तम होते. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही.” नेमके हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण, तुम्हीच सांगितले हे बरे केले, असा उपरोधात्मक टोला फडणवीसांनी लगावला. तसेच, कोरोनाच्या काळातसुद्धा भ्रष्टाचार करण्याचे काम झाले. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे कशाला म्हणतात, याचा अर्थ सरकारने समजावून सांगितला, असा आरोपही फडणवीसांनी विधानसभेत केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER