ही आहे दीपक तिजोरीची मुलगी समारा, सौंदर्याच्या बाबतीत ती सारा आणि जान्हवीवर करते मात

Samara Tijori - Deepak Tijori

‘आशिकी’, ‘खिलाडी’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘कभी हां कभी ना’, ‘अंजाम’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला दीपक तिजोरी (Deepak Tijori) निःसंशयपणे फिल्मी दुनियेपासून दूर आहे परंतु त्याची मुलगी समारा तिजोरी (Samara Tijori) खूपच चर्चेत आहे . येथे आपण चित्रपटांबद्दल बोलत नाही तर सोशल मीडिया बद्दल बोलत आहोत.

सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) आणि श्रीदेवीची (Sridevi) मुलगी जान्हवी (Janhvi Kapoor) सर्वत्र चर्चेत राहते, तर आणखी एक स्टारकिड आहे जो चित्रपटांपासून दूर राहून आपल्या पोस्टवर युझर्सचे लक्ष वेधून घेत आहे. दीपकची मुलगी समारा अवघ्या २४ वर्षांची आहे.

तिच्या वडिलांप्रमाणेच समारालाही अभिनयाच्या जगात यायचे आहे. त्याचा ‘ग्रँड प्लॅन’ हि शॉर्ट फिल्मही रिलीज झाली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये समाराने जोरदार हॉट सीन्स दिले. एका सीनमध्ये ती बिनधास्त अंदाजात सिगारेट ओढताना दिसली, तर एका सीनमध्ये तिने आपल्या को-स्टारबरोबर जबरदस्त लिप-लॉकदेखील केला.

समाराने डिशूम (२०१६) मध्ये दिग्दर्शक रोहित धवनलाही अस्सिस्ट केले आहे. समारा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असते. तिचे वडील दीपक तिजोरी आणि आई शिवानी यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या समोर येताच समारा चर्चेत आली आणि शिवानीने दीपक तिजोरीला घरातून काढून टाकले.

सांगण्यात येते की समारा तिजोरीचे बालपणातच अपहरण झाले होते, परंतु ती कशी तरी सुटली. अपहरणाच्या वेळी समारा १३ वर्षांची होती. समाराला अभिनयात रस आहे आणि त्यामध्ये तिला आपले करियर बनवायचे आहे. समाराला एक छोटा भाऊ आहे, त्याचे नाव करण तिजोरी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER