ही तर जनभावनेची अवहेलना – संजय निरुपम

Sanjay Nirupam

मुंबई :- कांजूर मार्गमधील मेट्रो कारशेडचे काम आहे त्या स्थितीत थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिले असून ठाकरे सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यासोबतच जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबईतील आरे कॉलनीमध्ये मेट्रोची कारशेड बनवण्यात येऊ नये, अशी सामान्य नागरिकाची भावना होती. मेट्रो कारशेडसाठी कांजूर मार्गपेक्षा चांगला पर्याय दुसरा कोणताही नाही. पण कांजूर येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या कामांना स्थगिती देऊन उच्च न्यायालयाने जनभावनेची अवहेलना केली आहे. योजना तयार करणे आणि त्यांची अमलबजावणी करणे हे न्यायालयाचे नव्हे, तर सरकारचे काम आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी न्यायालयाच्या निर्णयावर ट्विट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER