याला म्हणतात ‘ठाकरे ब्रँड’! मनसे नेत्याचे ट्वीट, तर शिवसेना म्हणते “हा बालिशपणा”!

CM Uddhav Thackeray - Raj Thackeray

मुंबई : हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा देण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिल्यानंतर काही तासातच त्याला परवानगी मिळालेली आहे . यानंतर मनसेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे . याला “ठाकरे ब्रँड” म्हणतात, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सरकारला टोला लगावला. देशपांडे यांनी सकाळीच केलेल्या एका ट्वीटनंतर हे दावे सुरू झाले आहेत. त्यांच्या ट्वीटवर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा बालिशपणा असल्याची खोचक टिप्पणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाफकिन संस्थेला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली होती. तसेच, हाफकिनमध्ये लस निर्मितीला परवानगी द्यावी, अशी मागणी देखील केंद्र सरकारकडे केली होती. नुकतीच केंद्राकडून ही परवानगी मिळाली असून हाफकिनमध्ये आवश्यक ती व्यवस्था आणि साधनसामग्री उभारण्यात आल्यानंतर तिथे लस निर्मिती शक्य होऊ शकणार आहे. मात्र, आज सकाळीच संदीप देशपांडे यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे या मुद्द्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button