याला म्हणतात शिवसेना आमदार, मुख्यमंत्र्याच्या आदेशावर कोरोना रुग्णांसाठी ९० लाखांची मोडली एफडी

Maharashtra Today

हिंगोली : सध्या राज्यात कोरोना (Corona)रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना बेड्स आणि औषधांसाठी वणवण भटकावे लागत. या सर्व परिस्थितीला हाताळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुरजोर प्रयत्न करत आहेत. प्रशासनासह, शिवसेनेच्या आमदारांना लागेल ती मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी तात्काळ दखल घेत ९० लाखांची एफडी मोडली (broken FD of Rs 90 lakh for Corona patients). कोरोना रूग्णांच्या उपचारात महत्वाचे ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजक्शनसाठी त्यांनी हे पाऊल उचलले.

सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव नेहमीच येतो. या कचाट्यात रेमडेसिवीर इंजेक्शनही अडकले. हे न पाहवल्याने आमदार संतोष बांगर यांनी स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले. आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी आणि जीव वाचवण्यासाठी शिवसेनेच्या या आमदाराने आपलं कर्तव्य दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे.

सुरुवातीच्या काळात ९०० रुपये दराने जवळपास पाचशे इंजेक्शन्स संतोष बांगर यांनी कोरोना रूग्णांना मोफत दिले होते. मात्र नंतर या इंजेक्शन्सचा तुटवटा निर्माण झाला अन् दर वाढले. त्यानंतर १८०० रुपयांनी काही इंजेक्शन्स वाटले. नंतर त्यांच्याकडे इंजेक्शन्स मिळतात, म्हणून त्यांना अनेकांचे फोन येऊ लागले. मात्र बाजारपेठेत व इतर जिल्ह्यांतही इंजेक्शन्स मिळत नसल्याने अडचणी वाढल्या. अशातच जिल्ह्यातील इंजेक्शनचाही स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड कुणी सोसायचा म्हणून एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हता. त्यातच आ. संतोष बांगर यांच्या कानावर ही बाब गेली. त्यांनीही प्रशासकीय चाकोरीला मुरड घालून ऑर्डर देण्याचे प्रयत्न केले. मात्र, यातून काहीच मार्ग निघत नव्हता. यात अग्रीम देण्यास विलंब होत असल्याचे लक्षात घेता एका खासगी वितरकास स्वत:च्या फिक्स डिपॉझिटमधील ९० लाखांची रक्कम उपलब्ध करून दिली.

बांगर यांच्या या मदतीमुळे शकडो कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार असून उद्या सोमवारपासून प्रत्यक्ष इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबावर संकट कोसळले आहे. आपले नातेवाईक, आप्तेष्ठ मृत्यूशी झुंज देत असतांना त्यांना वाचवण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड पाहतो. त्यांचे हाल पहावत नाहीत. त्यांना औषध गोळ्या वेळेवर मिळाव्यात यासाठी माझा प्रयत्न आहे. अनेकांशी या विषयावर बोललो तेव्हा इंजेक्शनच्या बाबतीतली अडचण कळाली. ती दूर करण्याचा प्रयत्न केला, असे बांगर म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मोदींच्या देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा; संजय राऊतांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button