… याला भुरटेगिरी म्हणतात; बाळासाहेब थोरातांना अतुल भातखळकरांचा टोमणा

Atul Bhatkhalkar & Balasaheb Thorat

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले – … आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन सत्तेपासून दूर ठेवलं हेच आमचं सर्वात मोठं यश आहे, यावर भाजपाचे आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी थोरातांना टोमणा मारला, वृत्तीला भुरटेगिरी म्हणतात.

बाळासाहेब थोरात त्या मुलाखतीत म्हणाले होते, विकासात रस नसलेल्या आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाजपाला आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन सत्तेपासून दूर ठेवले हेच आमचे सर्वात मोथे यश आहे. यावर अतुल भातखळकर म्हणाले, थोरातांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे आहेराचे पाकिट नसतानाही जेवणाच्या आशेने चोरून लग्नात जाण्यासारखे आहे.

भाजपाला सत्तेपासून दूर राखणं हेच यश आहे असे थोरातांनी म्हणणे म्हणजे एखाद्या लग्न सोहळ्यात सुग्रास जेवणाच्या आशेने चोरून शिरलेल्या आगंतुकासारखे आहे. ‘लग्नाला बोलवले नसतानाही आतमध्ये शिरता आले हेच यश! आता पोटभर जेवायला मिळेल मग खिशात आहेराचे पाकीट नसले तरी चालेल. अशा वृत्तीला भुरटेगिरी म्हणतात, या शब्दात भातखळकर यांनी थोरातांच्या वक्तव्याची टिंगल केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER