खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी अजितदादांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय

Ajit Pawar

मुंबई : शासकीय सेवेत थेट संधी मिळालेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या खेळाडूंच्या क्रीडा विकासासाठी उपयोग करून घेण्यासाठी सध्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक असलेले बदल लवकरच करण्यात येणार आहेत. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

शासकीय सेवेतील खेळाडूंनी अधिक खेळाडू निर्माण करावेत, नवीन खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन करावे यासाठी त्यांना मोकळीक असेल. सुधारित धोरणामध्ये गिर्यारोहणासारखे साहसी क्रीडाप्रकार, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेते मल्ल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आदींबाबतही विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.

या बैठकीत गेल्या दहा वर्षांतील अंमलबजावणीचा आढावा घेऊन नवीन सर्वंकष धोरण ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव संजयकुमार, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी उपस्थित होते.

खेळांचा सराव आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंना परवानगी देणे, माऊंट एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक, लिम्का किंवा गिनिज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेले स्पर्धक, शिवछत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू, महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल आदींनाही शासकीय सेवेत संधी देण्याबाबतही सुधारित धोरणात विचार करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER