शरद पवारांच्या स्वभावाचा हा एक पैलू ; ज्या व्यक्तीच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला गेले …

Sharad Pawar & PR Patil

सांगली : इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पी. आर. पाटील (P.R. Patil) यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यानिमित्त शरद पवार यांनी वाळवा तालुक्यातील कुरळपमध्ये अभिष्टचिंतन कार्यक्रमाला हजेरी लावली.

मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याला शरद पवार गेले त्याच व्यक्तीला आपल्या भाषणात राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशनच्या अध्यक्षपदाची ऑफर त्यांनी दिली. शरद पवारांच्या या घोषणेने परिसरात पुन्हा शरद पवारांच्या पुन्हा एका स्वभावाचे यानिमित्ताने दर्शन घडले. यालाच अनेकांनी शरद पवारांचं सहकार क्षेत्रातील चातुर्य असंही म्हटलं आहे.

यावेळी शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, गेली 51 वर्षे पी. आर पाटील हे सहकार क्षेत्रात आहेत. यातील 25 वर्षे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील यांची कारकिर्द घडली आहे.

तसेच पवार म्हणाले, सहकार क्षेत्रात 52 वर्षे राहणं अवघड आहे. मी देशाच्या लोकसभेत राज्यात विधानसभेत 52 वर्षे आहे. सहकार क्षेत्रातील पी. आर पाटील यांचे योगदान पाहून त्यांना राज्य सहकार क्षेत्रात अध्यक्षपदाची ऑफर देत असल्याचे पवार यांनी जाहीर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER