अश्विनी भावेंचं हे आहे खास गाणं.. 

Ashwini Bhave

” एक लाजरा न साजरा मुखडा ” हे गाणं ऐकलं की सगळ्यांना एकदम फ्लॅशबॅक होतो. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ कमालीचा ट्रेंड होतो तो म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांचा त्यांनी नुकताच त्यांच्या गार्डन मधला  मक्याच्या कणसासोबत एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेयर केला. अश्विनी भावे सध्या अमेरिकेत राहतात आणि तिकडे त्यांनी स्वतःच असं बेस्ट गार्डन आणि घरच्या घरी शेती केली आहे. नेहमीच आपल्या वेगवेगळ्या फुल झाडांचे , फळ झाडांचे व्हिडिओ त्या त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अमेरिकेत त्यांनी ” द ग्रीन डोअर ” ही संकल्पना राबवली आहे. या द ग्रीन डोअर मधून त्यांनी आजवर अनेक झाडांची लागवण केली आहे. अगदी फुल , फळ आणि भाज्यांसोबत त्यांनी ही वनराई फुलवली आहे.

त्यांनी या आधी असे कित्येक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत , दरवेळी काहीतरी नवीन प्रयोग करून आपल्या घराच्या आवारात अश्या प्रकारे झाड लावून अनेक कमालीचे प्रयोग त्यांनि केले आहेत. नुकतंच त्यांच्या या ग्रीन यार्डात मक्याचं कणीस उगवलं आहे याच आनंदात त्यांनी एक खास व्हिडिओ शेयर केला आहे. त्या म्हणतात माझ्या सुद्धा यार्डात ” एक लाजरा न साजरा मुखडा ” हे गाणं नक्की शूट होऊ शकत असं त्या म्हणतात. मक्याचं एक दाणा मी लावला होता आणि आज तेच मक्याचं कणीस एवढं मोठं झालंय असं त्यांनी या विडिओ मध्ये सांगितलं. अभिनयाच्या सोबतीने गार्डनिंग ची आवड जपत त्यांनी त्यांच्या या ग्रीन डोअर मध्ये खूप भारी झाडांची लागवण केली आहे. मला खूप जास्त झाड लावण्याची आवड आहे म्हणून मी ही गार्डनिंग ची आवड जपते असं त्या सांगतात.

मराठी सोबतीने हिंदी चित्रपट सृष्टीत नव्वदीच्या दशकात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ” अश्विनी भावे ” आपल्या अभिनय शैली ने त्यांनी इंडस्ट्रीत भरपूर काम केलं. आपल्या बहारदार कामाने प्रेक्षकांची मन जिंकून त्यांनी आजवर त्यांनी अनेक बहारदार चित्रपट केले. एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून आपण सगळेच त्यांना ओळखतो. ” अशी ही बनवाबनवी ते अगदी बंधन ” असा कमालीचा अभिनय पूर्ण प्रवास त्यांनी आजवर पार पाडला आहे.

अभिनेत्री अश्विनी भावे अमेरिकेत वास्तव्यास असतात आणि तिकडच्या अनेक खास गोष्टी आपल्याला त्या नेहमीच त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवत असतात. परदेशात राहून देखील त्यांनी आपलं मराठीपण जपलं आहे. अगदी गणपतीला मोदक बनवणं असू देत किंवा एखादा सणवार त्या परदेशात देखील तितकाच पारंपरिक पणे साजरा करतात. अमेरिकेत राहून त्यांनी मराठी संस्कृती आणि परंपरा यांच्या शी आपली नाळ कायम जोडून ठेवली आहे.

मराठीवरच प्रेम, संस्कृती आणि आपलं मराठीपण त्यांनी उत्तम रित्या जपलं आहे त्यांच्या अमेरिकेतल्या घरापुढे मस्त अंगण देखील आहे या अंगणात त्यांनी परसातील भाजी देखील लावली आहे. परसातली भाजी ही भारतीय संस्कृती त्यांनी अगदी परदेशात सुद्धा जपली आहे आणि म्हणून त्यांनी अनेक वेगवेगळ्या झाडांचे अनोखे प्रयोग केले आहेत.

” परसातली भाजी ” हा अनोखा उपक्रम गेले अनेक वर्षे त्या यशस्वीरित्या राबवत आहेत. आपल्या प्रेक्षकांना या उपक्रमाविषयी सांगण्यासाठी त्यांनी फेसबुकवर ” द ग्रीन डोअर ” ची निर्मिती केली या अंतर्गत त्या आपल्या परसातील भाजी आणि आपल्या घरी प्रत्यक्षात घरी राबवल्या जाणाऱ्या भाज्या यांची सखोल माहिती प्रेक्षकांना देतात. अश्विनी भावे यांनी त्यांच्या घराच्या कुंपणा मध्ये वेगवेगळ्या फळ ,फुल झाडाची , भाज्यांची बाग फुलवली आहे. अभिनयाच्या सोबतीने आपल्या गार्डनिग ची आवड जोपासत त्यांनी ही सुंदर बाग आपल्या परेशातील घरी फुलवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER