अजित पवारांकडून ‘या’ लाडक्या आमदाराला मिळाली ही खास भेट

Nilesh Lanka-Ajit Pawar.jpg

अहमदनगर :- पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanka) हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. पारनेर नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक फोडल्यानंतर लंके यांची राज्यभरात चर्चा होती.

अलीकडेच त्यांनी शरद पवारांच्या नावाने पारनेरला कोविड केअर सेंटरही सुरू केले आहे. आता याच कोविड केअर सेंटरसाठी पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कार्डियाक रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदर सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात ही रुग्णवाहिका लंके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. ग्रामीण भागातील सर्वांत मोठे आणि आरामदायी मोफत सुविधा आणि उपचार देणारे कोविड केअर सेंटर अशी लंके यांच्या कोविड सेंटरची ओळख बनली आहे.

स्वत: पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही या केंद्राचे कौतुक केले होते. पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे लंके यांच्या कामाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या केंद्रासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली कार्डियाक रुग्णवाहिका भेट देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER