ही तर काँग्रेसच्या तोंडावर चपराक; माजी मुख्यमंत्र्याची हताशा

Maharashtra Today

दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते जितीन प्रसाद (Jitin Prasad)यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. हा काँग्रेसला मोठा धक्का आहे. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. यावर काँग्रेसचे नेते हरीश रावत यांनी – जितीन यांनी पक्ष सोडणे ही काँग्रेसच्या तोंडावर मारलेली चपराक आहे, अशी हताशा व्यक्त केली.

जितीन प्रसार यांनी भाजपामध्ये प्रवेश करणे हे खूपच दु:खद आणि निराश करणारे आहे. त्यांनी काँग्रेसला स्थानिक पक्ष म्हटल्याने मला आश्चर्य वाटले. त्यांच्या कुटुंबियांनी ज्या पक्षाविरोधात संघर्ष केला त्यामध्येच त्यांनी प्रवेश केला हे गोंधळून टाकणारे आहे, असे रावत म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button