अक्षयकुमारच्या चित्रपटाचे नाव बदलले ही ऐतिहासिक घटना – मुकेश खन्ना

Akshay Kumar - Mukesh Khanna

महाभारतात पितामह भीष्मांची भूमिका साकारलेल्या मुकेश खन्नाने नंतर शक्तिमान बनून प्रेक्षकांच्या, विशेषतः बाल प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. अक्षयकुमारने (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटाचे नाव फक्त लक्ष्मी (Laxxmi) केल्याने मुकेश खन्नाने (Mukesh Khanna) आनंद व्यक्त करीत ही एक ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे.

मुकेश खन्नाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, इतिहासात या चित्रपटाचे उदाहरण दिले जाईल.तेवळ माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशातील जागृत नागरिकांसाठीही ही आनंदाची बाब आहे. बॉम्बला डिफ्यूज केले ते खूप चांगले झाले. यापुढे कुठलाही निर्माता, दिग्दर्शक हिंदू देवी देवतांचा अपमान करण्याची हिम्मत करणार नाही. लक्ष्मीच्या पुढे बॉम्ब शब्द जोडणे खोडसाळपणाच होता. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी असे करणाऱ्यांना परवानगी का द्यावी? एखादा निर्माता अल्लाह बम किंवा बदमाश जीसस असे त्याच्या चित्रपटाचे नाव ठेवण्याची हिम्मत करेल का? नाही ना. मग लक्ष्मी बॉम्ब का असा प्रश्नही मुकेश खन्ना यांनी उपस्थित केला.

पुढे मुकेश खन्ना म्हणतात, काही जण मुद्दाम अशी नावे ठेवतात. त्यांना ठाऊक आहे. याला काही जण विरोध करतील परंतु नंतर सर्व शांत होईल आणि आपण ठेवलेल्या नावाने चित्रपट प्रदर्शित होईल. यापूर्वीही असे अनेक वेळा झाले आहे. त्यांना हिंदूंच्या रागाची वर्वाच नाही. हिंदू सोशिक असून ते सगळे सहन करता. मात्र दुसऱ्या एखाद्या धर्माबाबत अशी भूमिका घेतली तर लगेच कशा तलवारी निघतात हे त्यांना चांगले ठाऊक आहे असेही मुकेश खन्नाने म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER