जगाची चीनकडे पाठ; भारतासाठी ही उत्तम संधी – नितीन गडकरी

Nitin Gadkari

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले. संपुर्ण जग अचानक आर्थिक संकटात सापडले. कोरोनाचा प्रसार सर्वप्रतम चीनमध्ये दिसून आला मग या विषाणुने जगभरात आपले जाळे विणले. त्यामुळे चीनचा आतापर्यंतचा व्यवहार पाहता संपुर्ण जगाने चीनलाच कोरोनाचा प्रसारक म्हणून अप्रत्यक्ष आरोप केला आहे. तसेच, चीनमधून कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर तेथील व्यापा-यांनीही चीनकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे.

त्यातच कोरोना व्हायरसने संपुर्ण जगाला संकटात टाकणा-या चीनसोबत व्यवहार करण्यासाठी जगभरातील अनुत्सुक आहेत. त्यामुळे भारतीय उद्योगांसाठी ही एक मोठी संधी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

जागतिक आर्थिक परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे, जग चीनशी व्यवहार करण्यास उत्सुक नाही. त्यामुळे भारतीय उद्योगांसाठी ही एक उत्तम संधी आहे. हा एक आहे एक छुपा आशीर्वाद आहे. आम्ही अधिक स्पर्धात्मक, गुणवत्तेच्या बाबतीत जागरूक आणि परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो असं गडकरी यांनी सांगितलं. ते न्यू इंडियामधील स्वावलंबी भारत या विषयावर वेबिनारला संबोधित करत होते.

गडकरी म्हणाले, सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी), कृषी विकासदर आणि ग्रामीण उद्योग विकास वाढविणे हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. “ईझ ऑफ डुइंग बिझिनेसमध्ये वर्ल्ड बँकेने निश्चितच आमची रँक वाढविली आहे, परंतु क्लियरन्स, प्रमाणपत्र आणि अनुपालन प्रक्रिया खूप जटील आहेत. आम्ही सर्व सिस्टम डिजिटल बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. “जीडीपी, कृषी विकासदर आणि ग्रामीण उद्योग विकास वाढविणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असेही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरांनी सांगितले आहे.

दरम्यान, पुढील पाच वर्षांत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)चे उत्पन्न १ लाख कोटी रुपयांवर नेण्याची योजना असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER